ट्रकमधुन सुरु असलेली गोवा बनावटीची दारू वाहतुक कणकवली पोलिसांनी रोखली…
🛑 २ लाख ६४ हजाराची दारू, ८ लाखांचा ट्रक, असा १० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. १५ कोरोनाचा दिवसेंदिवस कहर सुरूच आहे. त्यात निर्बंधही लादण्यात आलेत. असं असताना देखील सिंधुदुर्गात बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक सुरूच आहे. अशाच दारू वाहतुकीवर कणकवलीत पोलिसांनी कारवाई केलीय.
ट्रकमधून सुरु असलेली गोवा बनावटीची दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी रोखली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने हा ट्रक जात होता. यात 2 लाख 64 हजाराची दारू आणि 8 लाखांचा ट्रक असा 10 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित संतोष विठ्ठल शिंगाडे, वय 35, रानबांबुळी – कुडाळ, अनस इब्राहिम चेअरडीएल, वय 37, रा. सावंतवाडी व मूळ रा. केरळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई महामार्गावरील ओसरगांव येथील टोलनाक्यानजीक 14 जूनला सोमवारी सायंकाळी 7. 30 वा. सुमारास करण्यात आली. कारवाईत सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, कॉन्स्टेबल रुपेश गुरव सहभागी झाले होते.

