🛑 भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वेंगुर्ले प्रसाद पाटकर यांच्यावतीने परुळे गौतमनगर येथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
🛑 जन्मदिवशी कोरोणा पाॅसीटीव असल्याने कोणताही सामाजिक उपक्रम राबवता आला नव्हता याचे होते श्री प्रसाद पाटकर यांच्या मनात शल्य..
🛑 या सामाजिक उपक्रमाने झाला खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले, दि-१२ :- युवा मोर्चा तालुकाध्यक्ष वेंगुर्ले तथा परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष श्री प्रसाद पाटकर यांचा १४ मे ला वाढदिवस होता. परंतु स्वतः व कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना वाढदिवस साजरा करता आला नाही. याचे शल्य त्यांच्या मनात होते
दरवर्षी समाजपयोगी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. परुळे गौतमनगर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यामुळे वाडीतील सर्वांना कॉरंटाईन केले आहे. या वाडीतील बहुतांश कुटुंबे ही मोलमजुरी करून आपला चरित्रार्थ चालवतात. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.
ही बाब प्रसाद पाटकर यांनी ओळखली व आपला वाढदिवस या गरजूंना मदत करूनच साजरा करण्याचे त्यांनी ठरविले. प्रसाद पाटकर यांनी गौतम नगर चव्हाणवाडी धनगरवाडी तसेच आजूबाजूची गरीब कुटुंबे असे मिळून 112 कुटुंबाना साबण, बिस्कीट आणि अंडी या साहित्याचा वाटप केला व खऱ्या अर्थाने आपला राहून गेलेला वाढदिवस गरिबांच्या चेहऱ्यावर हसू आणून साजरा केला.
याबद्दल वाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले परुळे पंचक्रोशीतुन या उपक्रमांबद्दल प्रसाद पाटकर मित्रमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी माजी सरपंच प्रदीप प्रभू, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, पोलीस पाटील सुभाष घोलेकर, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, संतोष करलकर, बूथ अध्यक्ष अण्णा सावंत, सीमा सावंत, जिजाई परुळेकर, भद्रायू परुळेकर, अमेय देऊलकर, अमित परुळेकर, सचिन परुळेकर, पिंटो परुळेकर, चंद्रकांत परुळेकर, नितेश परुळेकर, प्रशांत परुळेकर, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

