आणखीआरोग्यकोकणदोडामार्गसिंधुदुर्ग

साटेली- भेडशीत ग्राम विलगीकरण कक्षाचे प. स. माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य सुनंदा धर्णे यांच्या हस्ते उद्घाटन..

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१० :- कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता साटेली – भेडशी ग्रामपंचायतीने जि. प. केंद्र शाळा साटेली – भेडशी येथे ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केला. या ग्राम विलगीकरण कक्षाचे उद्घाटन दोगमार्ग पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्या सुनंदा धर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रा.वि.अधिकारी एस.बी गावडे, तलाठी सचिन गोरे, सरपंच लखू खरवत, उपसरपंच गणपत डांगी, आरोग्य सेवक पाताडे, केंद्र प्रमुख सुर्यकांत नाईक, शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम पालव , व ग्रामपंचात सदस्य आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!