🛑 कोवीड काळातील जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे काखेत कळसा नी गावाला वळसा ; काका कुडाळकर
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्ग, दि-०९ :- गेले वर्षभर कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कडक लॉक डाऊन लावल्यामुळे कोरोनाची साथ आटोक्यात येत होती. परंतु आर्थिक व्यवहाराबाबत मात्र समाजाला मोठी झळ सोसावी लागली होती. यातच रुग्ण संख्या कमी झाल्यावर मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. लोकांमध्ये गाफीलपणा आला व आपल्याला भीषण अशा दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागले. जिल्हा आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला अशावेळी मात्र भाजपच्या अध्यक्ष राजन तेली असतील वा अन्य जिल्हा परिषदचे पदाधिकारी मात्र सातत्याने यासाठी जिल्हा प्रशासनाला व जिल्हा आरोग्य यंत्रणेला दोष देत होते. राजन तेली तर वारंवार कोवीड सेंटर उभारण्याच्या घोषणा करत होते.तसेच जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी असाहि हट्ट धरून आहेत. तर काही पदाधिकारी आतापर्यंत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा खर्चाचा हिशोब विचारत होते.
वास्तविक पाहता वाढते रुग्ण संख्येमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत होती. अशा वेळी त्याला सहाय्यभूत अशी यंत्रणा उभी करणं आवश्यक आहे.यावेळी आमचे जिल्हा अध्यक्ष श्री.अमित सामंत यांनी तातडीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री मान.नाम.जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचेकडून 50 कॉटचे सर्व सुविधा असणार कोवीड सेंटर मंजूर करुन घेतलं.अशी यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सक्षम होती. आज 38 प्राथमिक आरोग्य(PHC) केंद्र व 250 उपकेंद्रांचे जाळे जिल्हाभर आहे.तसेच या यंत्रणेकडे डॉक्टर नर्सेस सह 600 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. अंगणवाडी सेविका व आशा वर्कर हे वेगळेच. तर महत्त्वाचे म्हणजे एन. एच. एम.(N.H.H) ग्रॅंट मधून डॉक्टर, स्टाफ नर्सेस, वॉर्डबॉय ,आशा वर्कर्स मानधन यांचेबरोबर डिझेल साठी चाही निधी दिला गेला आहे. यासाठी आज पर्यंत जिल्हा परिषद कडे सात कोटी दहा लाख (7कोटी10लाख)निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. तर जिल्हा परिषदेने पाच कोटी 43 लाख(5कोटी43लाख) खर्चही केले आहेत. एवढे सर्व असताना अजून पर्यंत जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालयाकडे येणारा लोंढा थोपवण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.परंतु आज राजन तेली यांच्या भाजपकडे जिल्हा परिषद बरोबरच पंचायत समिती नगरपरिषद एवढी सत्ताकेंद्रे आहेत.तर यावर केंद्रातील सत्तेचा वरदहस्त आहे.असे असतात फक्त राज्य शासनाच्या कारभारावर सातत्याने टीका करण्याचं कामच ही मंडळी करत आहेत. खरं म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याचे काम केलं पाहिजे होतं. जिल्हा कोवीड कमिटीकडे निदान प्रत्येक तालुक्यात एक असणाऱ्या मदर पी एच सी अशा आठ पीएचसी जरी सर्व सोयींनी युक्त अशा कोवीड सेंटरसाठी करण्यासाठीप्रस्ताव दिला असता, तर आज जिल्हा रुग्णालयाबाहेर रूग्ण घेऊन उभ्या असलेल्या ऍम्ब्युलन्सच चित्र जिल्ह्याला पाहता आलं नसतं. जिल्हा परिषद मधील आपली सत्ता ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी कशी वापरता येईल ते माजी अध्यक्ष व माजी आमदार असणाऱ्या विद्यमान भाजप जिल्हाध्यक्ष राजन तिली पाहावं व पुढील येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून दिलासा देण्याचे काम करावं. आज राजकारणापेक्षा समाजकारणाची गरज जनतेला आहे हे विसरु नये.

