🛑 मळेवाड विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी डॉक्टर बुरांडे यांच्या कडूनदेण्यात आले योग्य प्रशिक्षण..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.०८-: मळेवाड येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी डॉक्टर बुरांडे यांच्याकडून योग्य प्रशिक्षण देण्यात आले.गृह विलगिकरण शासनाने बंद केल्याने गावातील रुग्णांना विलगी करणात राहता यावे. यासाठी ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा 1 या शाळेत पंधरा बेडचा सुसज्ज असा विलगीकरण कक्ष सुरू केला आहे.
यात गावातील सहा रुग्ण विलगीकरण कक्षात असून या रुग्णांसाठी आरोंदा येथील डॉ. सचिन पुराणिक यांनी योग प्रशिक्षण दिले.यावेळी प्रशिक्षण देत असताना योगाचे महत्त्व रुग्णांना समजावून सांगत प्राणायाम व अन्य योग आपल्या आरोग्यासाठी कोरोना काळात किती महत्त्वपूर्ण आहे, याचे मार्गदर्शन पुराणिक यांनी केले. तसेच कोरोना बद्दल मनात असलेली भीती दूर होण्यासाठी समुपदेशनही केले.

