आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉंग्रेस थाळी सुरू..

🛑 कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते भोजनाच्या कंटेनर चे वाटप करून करण्यात आली या उपक्रमाची सुरुवात..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि.०५-: राष्ट्रीय कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर कॉंग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉंग्रेस थाळी सुरू करण्यात आली आहे.
कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते भोजनाच्या कंटेनर चे वाटप करून या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर आदी कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!