माजगांव ६ ते १५ जून पर्यत पुर्ण बंद;सर्वानुमते घेण्यात आला निर्णय
*नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई*
सावंतवाडी:-तालुक्यात वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता आता ही साखळी तोडणे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.सावंतवाडीत माजगांव गावातही दिवसाला बरेच रुग्ण आढळत आहेत याचपार्श्वभुमीवर आज माजगांव येथे ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन यांच्यामध्ये एकत्रित सभा घेऊन माजगांव ६जून ते १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये फक्त मेडिकल,डाँक्टर यांची दालने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे.याव्यतिरिक्त कोणतीही आस्थापने खुली दिसल्यास दंडात्मक कारवाई तसेच विनामास्क कोणीही आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.तसेच सर्वच ठिकाणी ग्रामपंचायत च्या वतीने सगळीकडे नाकाबंदीही करण्यात येणार असून विनाकारण फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी सरपंच दिनेश सावंत,उपसरपंच संजय कानसे,जि.प.सदस्या रेश्मा सावंत,ग्रामसेवक गोसावी,तलाठी पास्ते,पोलिसपाटील विनोद जाधव,आरोग्यसेविका सौ.सावंत,सर्व ग्रा.पं.सदस्य आदी उपस्थित होते.