आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 साटेली भेडशी बाजारपेठ राहणार ११ दिवस बंद ५ जून ते १५ जून पर्यंत मेडिकल वगळता सर्व सेवा बंद ; सरपंच लखू खरवत

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : शंकर जाधव

🎴दोडामार्ग, दि-०२ :- तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून आता महसूल देणाऱ्या बाजारपेठाही बंद करण्याची पाळी ही दोडामार्ग तालुका वासीयांवर येऊन ठेपली आहे. दोडामार्ग तालुक्यातील महसूला बाबत सर्वात मोठी समजली जाणारी साटेली भेडशी बाजारपेठेतील आता ५ जून पासून पुढील ११ दिवसांकरिता मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत, याबाबत सरपंच लखु खरवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसात तब्बल १२९ रुग्ण साटेली भेडशी बाजारपेठ परिसरात पॉझिटिव्ह मिळाले होते. यातील ०५ रुग्ण एक्टिव्ह असून  अजूनही  कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. यासाठी शासनाबरोबर कोरोना ग्रामस्तरीय नियंत्रण कमिटीने हा निर्णय घेतल्याचे लखु खरवत यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे.

 

५ जून ते १५ जून या कालावधीत मेडिकल वगळता सर्व सेवा बंद राहणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हणण्यात आले असून अवैधरीत्या कोणताही व्यावसायिक व्यवसाय करताना आढळल्यास त्याच्यावरती कारवाई करणार असल्याचे असल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

वाढती रुग्ण संख्या ही दोडामार्ग सारख्या दुर्गम व आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या असलेल्या दोडामार्ग तालुक्याला भयावह असून कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे आरोग्य विभागा समोर मोठे आव्हान बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!