रत्नागिरीशैक्षणिक

घरडा महाविद्यालयातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती जाहीर..

पद्मश्री डॉ. घरडा घेणार १०१ विद्यार्थ्यांचे पालकत्व..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०८: लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे बारावी सायन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी महाविद्यायात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत गुणवंत अश्या १०१ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वतः पद्मश्री डॉ. के. एच. घरडा घेणार आहेत. या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना घरडा महाविद्यालया मध्ये प्रवेश घेतल्यास फक्त परीक्षा फी आणि इतर नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे, तर उर्वरित सर्व फी शिष्यवृत्ती स्वरूपात महाविद्यालयातर्फे दिली जाणार आहे. ही योजना महाविद्यालयातील सर्व शाखांसाठी खुली असून, जे गुणवंत विद्यार्थी शासनाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेद्वारे घरडा महाविद्यालयात प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १२वी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेली असणे, आणि पी.सी.एम. ग्रुप मधून सीईटी परीक्षा देणे अनिवार्य आहे. तसेच अभियांत्रिकी प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

महाविद्यालयाचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांच्याकडून नेहमीच समाजउपयोगी अनेक उपक्रम राबविले जातात. लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तसेच लवेल येथे उभारलेले बाई रतन बाई घरडा हॉस्पिटल हे याचेच उदाहरण आहे. गेल्या दशकात डॉ. घरडा यांनी कोकणातील अनेक शाळा दत्तक घेतल्या आहेत, तसेच घरडा केमिकल्स च्या माध्यमातून अनेक गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांचे नियोजन व काम अजूनही उत्तम पद्धतीने चालू आहे. अश्याच समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या डॉ. घरडा यांनी यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली कठीण परिस्थिती लक्षात घेऊन सामान्य कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपये इतक्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. कोकणातील तसेच सामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेमुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणे आता सुखकर होणार आहे.

घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय चिपळूण खेड मार्गावरील लवेल गावामध्ये असून ते कोकणातील प्रथम नॅक मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. येथे मेकॅनिकल, सिव्हील, कॉम्प्युटर केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या शाखा उपलब्ध आहेत. गेल्या १२ वर्षाच्या प्रवासात महाविद्यालयाने अनेक क्षेत्रात आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली आहे. तरी जे विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क करावा – प्रा. कोळेकर 8888260267, प्रा. तिरुपती 99232 65075, प्रा. पाटील 9552700888, श्री गुरव 9822765402, श्री गजमल 9405595195, श्री अमोल साळुंखे ९४०५५९५०७५.  तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे.

_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!