आणखीआरोग्यकणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आज कणकवली शहरात १५० च्यावर टेस्ट

🛑 दुपारपर्यंत ९२ रॅपित टेस्ट, २ व्यक्ती पॉझिटिव्ह

🛑नगरपंचायतचे मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस अधिकारी यांची कणकवली पटवर्धन चौकात भेट

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २७ जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आज दिवसभरात १५० रॅपिड करण्यात येणार असुन, कणकवली शहरात वाढणार्‍या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी अवधुत तावडे हे स्वतः फिल्डवर उतरले आहेत.

कणकवली तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर तालुक्यात काल सायंकाळी उशिरा आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार ८३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असुन, तिघांचा कोरोनाने मृत्यु झाला. त्यात पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये कणकवली शहरातील १६ जणांचा समावेश आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यासह शहरात सर्व ठिकाणी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसत आहे.

कणकवली तालुक्यात झालेला कोरोनाचा मोठा फैलाव पहाता आज सकाळपासुनच कणकवली पटवर्धन चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यामुळे चौकात भलीमोठी रांग लागली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सदर टेस्ट करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासह पुढील काळात अत्यावश्यकमध्ये येणाऱ्या दुकानदारांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले, तर कडक कारवाईचे आदेश दिले.

अत्यावश्यक सेवेत असलेल्या दुकानदारांनी दुकानासमोर एक चौकोन आखावा, अशी माहिती वैशाली राजमाने यांनी दिली आहे. अत्यावश्यक मध्ये नसलेली दुकाने उघडी दिसल्यास, त्यांच्यावर दंड आकारून कारवाई करण्यात येणार आहे. असेदेखील वैशाली राजमाने यांनी म्हटले आहे.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी स्वतः उपस्थित राहत शहरात विनाकारण फिरणारे, भाजीविक्रेते, व्यापारी, रिक्षा व्यावसायिक आदींची रॅपिड टेस्ट करणे भाग पाडले. यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तसेच डीवायएसपी नितीन कटेकर यांनी संयुक्त मिळुन कणकवली शहरातील दुकानांची, तसेच चौका – चौकात फेर फटका मारत पाहणी केली.

पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकामार्फत ही टेस्ट करण्यात येत असुन नगरपंचायत कर्मचारी, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या फिरत्या पथकाद्वारे देखील टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

पटवर्धन चौकात कार्यरत असलेल्या आरोग्य पथकात समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, गिलबर्ट फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर, नगरपंचायत कर्मचारी रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, रमेश कदम, यांच्यासह तालुका आरोग्य समन्वयक निखील जाधव आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्यासह पोलीस पथकाने ११ वाजल्यानंतर शहरात गस्त सुरू केली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ यांनी पटवर्धन चौकात उपस्थित राहत या रॅपिड टेस्टचा आढावा घेतला.

दुपारी १.३० वाजेपर्यंत ९२ रॅपिड टेस्ट करण्यात आले असुन, त्यात २ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आली आहे.

यामुळे आता विनाकारण फिराल, तर रॅपीट टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय फिरणे टाळा. घरी राहणे योग्य असुन, कोरोना नियम पाळणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!