कणकवली तालुक्यातील बनसोडे उपकेंद्र येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ
🎥कोकण लाईव्ह ब्रेकींग
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २५ तालुक्यातील बनसोडे उपकेंद्र येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते पार पडला. सरपंच सौ. मृणाल पारकर, उपसरपंच विलास मराठे, प्रा.आ. केंद्र फोंडाघाट रुग्ण समिती सदस्य दीपक सावंत यांच्या मागणीला यश आले आहे. जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत आणि सभापती मनोज रावराणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हे केंद्र मंजुर करण्यात आले आहे.
घोणसरी येथील लसीकरण केंद्रामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास सभापती मनोज रावराणे यांनी व्यक्त केला.
लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना भाजपा कणकवली तालुका उपाध्यक्ष छोटु पारकर, तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर आणि भाजपा बुथ सचिव कृष्णा पेडणेकर यांच्याकडुन पाणी बिस्कीटचे वाटप, तर घोणसरीचे सुपुत्र आणि मुंबई बुथ क्र. २०२ चे अध्यक्ष चंद्रकांत राणे यांच्याकडुन चहा वाटप करण्यात आले.
यावेळी घोणसरी सरपंच सौ. मृणाल पारकर, उपसरपंच विलास मराठे, भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटु पारकर, भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य लवु सावंत, भाजपा तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर, रुग्ण समिती सदस्य दीपक सावंत, भाजपा ओबीसी सेल शक्तीकेंद्र प्रमुख दत्ताराम गुरव, भाजपा बुथ अध्यक्ष बाबु राणे, माजी उपसरपंच प्रसाद राणे, मिलिंद मराठे, कृष्णा पेडणेकर, अनिल राणे, विजय एकावडे, घोणसरी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. मराठे, घोणसरी उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना पाटील, आरोग्य सेवक शंकर राठोड, आरोग्यसेविका श्रीमती. देवरुखकर, श्रीमती. पेडणेकर आदी कर्मचारी, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.