टायगर ग्रुप कोकण विभाग सिंधुदुर्गकडुन वेंगुर्ले येथील कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंची मदत
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 वेंगुर्ले : दि. २४ टायगर ग्रुप कोकण विभाग सिंधुदुर्गकडुन वेंगुर्ले येथील कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार गेला, त्यात तौक्ते वादळामुळे अजुन परिस्थिती हालाखीची बनली. त्यांना आधार देण्यासाठी टायगर ग्रुप कोकण विभाग सिंधुदुर्गच्या वतीने मदतीचा हाथ कुटुंबाला देण्यात आला. वेंगुर्ले बाजारपेठ येथील शिरोडकर कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा टायगर ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी टायगर ग्रुपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर, सिंधुदुर्ग उपाध्यक्ष हर्षल बेळेकर, जिल्हा संघटक आणि संपर्कप्रमुख प्रयाग कांबळे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख सिद्धेश भोगले, टायगर कोकण कमिटी सदस्य मंदार गावडे, मालवण टायगर ग्रुप तालुकाप्रमुख दिपेश पवार, उपतालुकाप्रमुख रोहन सावंत, प्रथमेश हजारकर, वैभव खोबरेकर, अक्षय राजपुत, अनिकेत सावंत, सर्व पदाधिकारी व वेंगुर्ले येथील सदस्य उपस्थित होते.
असेच सामाजिक उपक्रम सिंधुदुर्गमध्ये राबवत राहा, असे म्हणुन टायगर ग्रुप सिंधुदुर्गचे आभार मानले. पुढील काळात सिंधुदुर्गवासीयांसाठी टायगर ग्रुपतर्फे सामाजिक उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही देण्यात आली.
navajsayyad123@gmail.com
7507577497
Pimpoloshi. Tal patan satara