आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी शहरातील रम्य ठिकाणी तीन युवक गाडी लाऊन दारू पीत असताना सावंतवाडी मुख्याधिकारी अधिकारी जयंत जावडेकर यांनी पकडले रंगेहाथ..

 

◾जावडेकर यांच्या कारवाईचे पालक वर्गातून समाधान व्यक्त..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२३:- सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरोडकर टेंब चिवार टेकडी येथील रम्य ठिकाणी सावंतवाडी शहरातील तीन युवक टेकडीच्या रस्त्यावर गाडी लाऊन दारू पीत असताना सावंतवाडी मुख्याधिकारी अधिकारी जयंत जावडेकर यांनी रंगेहाथ हात पकडून दणका दिला.

शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बिरोडकर टेंब मार्गे मुख्याधिकारी जावडेकर चिवार टेकडी येथे गेले तेव्हा पंचविशीतील तीन युवक रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकी लावून त्यावर बसून दारू पीत असल्याचे निदर्शनास आले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी त्या युवकांवर दंडात्मक कारवाई करू यापुढे असे कृत्य केल्यास चौपट दंड आकारू असा इशारा दिला व असे व्यसन करून जिवन बरबाद करण्यापेक्षा शरीराला पोष्टिक असणारी फळे खावा ,व्यायाम करा ,ट्रेकिंग करा, शिवचरित्र वाचा, असा सल्ला दिला व त्या युवकांचे शूटिंग करून नंतर त्यांना सोडून दिले.

सावंतवाडी शहरात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या युवकांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेणार असल्याचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सांगितले, जावडेकर यांच्या कारवाईचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!