आणखीकोकणक्राइममहाराष्ट्र

◾महाराष्ट्र राज्य भरारी पथकाच्या सलग दोन कारवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२१ :- कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच . सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे व मा. श्रीमती उषा वर्मा, संचालक (अं.व द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकाने दि. १९/०५/२०२१ रोजी मौजे पळस्पे गावचे हद्दीतून गोव्याकडून मुंबईकडे जाणान्या राष्ट्रीय महामार्गावरील किनारा ढाबा (जय मल्हार गार्डन रेस्टॉरंट) समोर ता. पनवेल जि. रायगड येथे सापळा रचून टाटा कंपनीचा विटकरी (ब्राऊन) मालवाहक ट्रक क्र. HR-39-E-9369 या वाहनामधून गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे रॉयल चॅलेंज, ऑफिसर चॉईस ब्ल्यु व्हिस्की व ओल्ड मंक रमचे १८० मिली ७५० मिली क्षमतेचे एकूण ५०० बॉक्स व वाहनासह एकूण रु. ५६,५०,५००/- किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी ट्रक चालक शिकू विरेंद्रकुमार मिश्रा वय ४२ वर्षे व क्लिनर शैलेश अच्युतन पद्मावती वय ३९ वर्षे दोघेही राहणार बारदेज गोवा यांना अटक करण्यात आले असून काशिराम चंद्रकात आंगणे, रा. पोईप, जि. सिंधुदुर्ग व इतर आरोपींची संशयित म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. संताजी लाड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. त्याचप्रमाणे पथकाने सलग दुसऱ्या दिवशी दि. २०/०५/२०२१ रोजी हॉटेल शिवनेरी फॅमिली रेस्टॉरंटच्या समोर,कमळेश्वर पिंपळगावच्या हद्दीत, बीड उस्मानाबाद महामार्गावर, ता. वाशी, जि. उस्मानाबाद येथे सापळा रचून एका टाटा कंपनीच्या दहा चाकी मालवाहक ट्रक क्र. MP-09-HF-8604 वाहनामधून गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले १८० मिली क्षमतेचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे ५७५ विदेशी मद्याचे बॉक्स वाहन असा एकूण रु. ४३,९३,०००/- किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. सदर प्रकरणी ट्रक चालक महेश हरेसिंग अजनारे, वय ३१ वर्ष व ट्रक क्लिनर काना राधेश्याम चारल, वय २४ वर्ष दोघेही राहणार जिल्हा:- धार राज्य मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली असून मद्य पुरवठादार दिपक राजपूत व भाईजान मौलाना यांची संशयित आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मनोज चव्हाण करीत आहेत.

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये १,००,४३,५००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरच्या कारवाईमध्ये निरीक्षक श्री. संताजी लाड, निरीक्षक श्री. मनोज चव्हाण, निरीक्षक श्री. प्रमोद कांबळे, दुय्यम निरीक्षक श्री. दिलीप काळेल, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे जवान सर्वश्री विशाल बस्ताव, सदाशिव जाधव, अमोल चिलगर, रवि पाटील, सोमनाथ पाटील, धनाजी दळवी, सुभाष रणखांब जवान नि वाहनचालक श्री. बी. जे. दळवी, श्री. सुधीर देसाई यांनी भाग घेतला.

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉट्स अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६६३८८१ वर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!