◾तौक्ते वादळाचा कसाल पंचक्रोशीतीला तडाखा ; तीन लाख पेक्षा जास्त नुकसान..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल, दि-२१ :- सिंधुदुर्गात धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका कुडाळ तालुक्यातील कसाल पंचक्रोशीला बसलाय तीन लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झाले असून राहती घरे, आरोग्य केंद्र ,गुरांचे गोठे,मांगर , दुकाने, काजू बाग, आंब्याच्या बागा, केळी बाग यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . वादळाच्या दिवसापासून म्हणजे रविवारपासून ठिक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर उन्मळून मोडून पडल्यामुळे विद्युत खात्याचे मोठे नुकसान झाले आहे . या वादळाने कसाल पंचक्रोशी दणका दिल्याने प्रचंड हानी झाली आहे .कसाल नवा बाजार येथील मनोहर पेडणेकर यांच्या घरावर झाड पडल्याने ४० ते ४५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सत्यवान परब इंदिरा मेस्त्री ,राजन परब, बापू शिंगाडे, यांच्या घरावरील पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर तुळाजी परब, भिवाजी परब ,योगेश बालम, विलास बांदेकर यांच्या घरांवर व दुकानांवर झाडे पडून यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर कसाल आरोग्य केंद्राचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले. कसाल गावातील आतापर्यंत एकूण अकरा जणांची नुकसानाची भरपाईची नोंद कसाल तलाठी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. अजून काजू बाग आंब्याची बाग व केळी व अन्य नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम चालू आहे .
कसाल मंडळ अधिकारी संतोष गुरखे कसाल तलाठी संतोष बांदेकर उपसरपंच दत्ताराम सावंत ग्रामविकासअधिकार एस बी कोकरे, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आदींनी पंचनामे घातले आहेत कसाल पंचकोशीत विद्युत वितरणचे मोठे नुकसान झाले आहे कसाल गावात विद्युत वितरणचे दोनच कर्मचारी असून वीजवितरणने यांच्या मदतीला आणखी किमान दोन कर्मचारी कायमस्वरूपी कसाल गावाला द्यावेत अशी मागणी कसाल ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

