◾मुख्यमंत्री ठाकरे जितक्या वेळासाठी कोकणात आले तेवढा वेळ फक्त माणूस आंघोळीला घेतो ; माजी खासदार निलेश राणे
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग,दि.२१ -: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जितक्या वेळासाठी कोकणात आले. तेवढा वेळ फक्त माणूस आंघोळीला घेतो. असा जोरदार टोला माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
यावेळी त्यांनी ते आले पण न पाहताच निघून गेले असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी फक्त एकाच ठिकाणी फेरफटका मारला असून, कोणत्याही वादळ ग्रस्तांची भेट घेतली नसून, नुकसानीचा पाहणी दौरा देखील रद्द केल्याने जोरदार टीका केली आहे. यावेळी निलेश राणे यांनी शिवसेना कोकणी माणसाला संपवायला निघाली असून, कोकणी माणसाने ते समजून जावे असा इशारा देखील दिला आहे.

