कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾युध्दपातळीवर कुडाळ शहरातील सर्व प्रभागातील चक्री वादळ, पावसामुळे तुंबलेली गटार,नाल्यांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तातडीने साफसफाई करावी ; राकेश कांदे

 

◾भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक राकेश कांदे यांची कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या जवळ मागणी..

◾रस्त्यावर खोदाईमुळे पडलेले चर अभियंत्यांच्या देखरेखीखाली डांबरीकरण करुन योग्य रितीने बुजवावे..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ, दि-२० :- झालेल्या चक्रीवादळामुळे कुडाळ शहरातील सार्वजनिक आणि लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. परिणामी शहरातील सर्वच प्रभागातील काही गटारे /नाले माती, दगड, आदी वाहून आलेल्या साहित्यामुळे तुंबलेले आहेत. शिवाय पावसाळ्यात तोंडावर आहे तरी तातडीने सर्व प्रभागातील गटारे /नाले यांची युध्द पातळीवर साफसफाई करावी आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात जादा सफाई कर्मचारी घ्यावे .शिवाय रस्तावर जे खोदाई केल्याने चर पडलेले आहेत ते अभियंत्यांच्या देखरेखी खाली डांबरीकरण करून संबंधित नेमलेल्या ठेकेदाराकडून योग्य रितीने बुजवावेत अन्यथा आपल्या अधिकारात योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी कुडाळ भाजपा शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी श्री नितीन गाढवे यांचेकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!