◾कोल्हापूर येथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवण व्यवस्था ; अँड. परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक, सावंतवाडी
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-१८ :- कोविड 19 च्या उपचारासाठी कोल्हापूर शहरात बरेच गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत.दाखल असलेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात येते. शासनाच्या निर्बंध व नियमानुसार बाजारपेठा व हॉटेल्स ही पूर्ण वेळेत खुली नसल्याने रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांना जेवण अभावी उपाशी राहावं लागत असल्यामुळे अतोनात हाल होत आहेत. सदर बाब अँड. परिमल नाईक, यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर येथे दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी त्यांच्या मार्फत मोफत जेवण पुरविण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या करिता गरजवंतांनी खालील मोबाईल वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*अँड. परिमल नाईक, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक, सावंतवाडी* – 9422436805
*श्री. संतोष (आप्पा )लाड,भा. ज. पा. जिल्हा व्यापारी आघाडी कोल्हापूर* -9422522525

