◾मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे ; राजू जाधव
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-१८ :- नुकताच ठाकरे सरकारने मागासलेल्या शासकीय कर्मचाऱ्यान संदर्भात शासकीय पदोन्नती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या विरोधात सरकार मधीलच काँग्रेस चे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत आणि महाराष्ट्र सरकार मधील अनेक मंत्री आणि आमदारांनी आवाज उठवत निर्णय मागे घेण्याची सूचना केली आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजामध्ये असंतोष पसरला आहे.कोकणातील अनेक मागासवर्गीय संघटना आणि समाजाने या बाबत आपल्या जवळ संपर्क साधला असून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सरकारने या निर्णयाचा पुनर विचार करावा अन्यथा प्रत्तेक जिल्हा ,तालुक्यामध्ये आंदोलन छेडण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी दैनिक रत्नागिरी टाईम्स शी बोलतांना इशारा दिला आहे.
आर्थिक दुर्बल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी पूर्वीपासूनच रिपब्लिकन पक्षाचे भूमिका आहे सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे व त्यांना न्याय द्यावा असे राजू जाधव म्हणाले,पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू महाराज,महात्मा जोतिबा फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचे राजकारण कधीच झालेले नाही मराठा समाज हा समाज हा भारतीय संविधान मानणारा असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यानी आपल्या आरक्षणाच्या संदर्भात न्याय हक्कासाठी अतिशय मोठी आंदोलने केली आहेत त्यांच्या मागणीचा महाराष्ट्र व केंद्र सरकारने विचार करून योग्य पद्धतीने निर्णय घ्यावा असे राजू जाधव यांनी म्हटले आहे.सध्या कोरोना महामारीमुळे सामाजिक राजकीय संघटना सरकारला सहकार्य करीत असून सरकारने मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोनत्तीचा पुनर्विचार न केल्यास महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे राहिल असे राजू जाधव यांनी म्हंटले आहे.

