◾टक्केवारीवर जगणाऱ्या सेना तालुका प्रमुखांचा चेहरा तालुक्यात प्रसिद्ध ; भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-१५-: टक्केवारीवर जगणाऱ्या सेना तालुका प्रमुखांचा चेहरा तालुक्यात प्रसिद्ध असून, ज्यांना स्वतःच्या गावासह शेजारील मळगाव गावातील ग्रामपंचायत ज्यांना वाचवता आली नाही. त्यांच्यावर काय बोलणार असा उपरोधिक टोला भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी तालुक्यात दर दिवशी १५ – २० जणांच्या मृत्यूची जबाबदारी रुपेश राऊळ घेणार आहेत का? असा सवाल देखील प्रसिद्धिपत्राद्वारे उपस्थित केला आहे. सर्व सामान्य जनतेबरोबर लोक प्रतिनिधी मृत्यूमुखी पडत असताना रुपेश राऊळ हे कार्यकारी अभियंता यांना दमदाटी करून आपल्या ठेकेदारांना काम देऊन टक्केवारीचा धंदा करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी गेल्यावर्षी पंतप्रधान सहाय्यता निधीतून आलेले व्हेंटिलेटर अजूनही बंद स्थितीत असून, त्याचा थांग पत्ता पालकमंत्री व आमदार यांना नसल्याने तालुक्यात मृत्यूचे थैमान सुरू असल्याचा आरोप अजय गोंदावळे यांनी केला आहे. आज भाजपचे सर्व लोक प्रतिनिधी रस्त्यांवर उतरून काम करत असून, सेनेचे लोक प्रतिनिधी मात्र मिस्टर इंडिया झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी रुपेश राऊळ यांनी कमावलेल्या टक्केवारी तील पैशातून कोव्हीड साठी मदत करावी असा उपरोधिक टोला लगावला आहे.

