◾पालकमंत्री उदय सामंत यांचे परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरात लवकर रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन..
◾म्हापण जि. प. विभागातील शिवसेना प्रणित सरपंच व शिवसेना पदाधिकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन केली रुग्णवाहिकेची मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले, दि-१४:- म्हापण जिल्हा परिषद विभागातील शिवसेना प्रणित सरपंचांनी एकत्र येऊन पालकमंत्र्यांची भेट घेतली व परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनीही काळाची गरज ओळखून प्राधान्याने परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले आहे.
दरम्यान सध्या स्थितीत परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात एक रुग्णवाहिका आहे पण ती आता जुनाट झालेली असून तेवढी कार्यक्षम राहिलेली नाही. त्यामूळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी येथे तातडीने नविन रुग्णवाहिकेची गरज आहे.
दिवंगत शिवसेना जि. प. सदस्य कै. सुनिल म्हापणकर यांची सुध्दा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
पालकमंत्र्यांना हे निवेदन सादर करताना शिवसेना म्हापण विभाग प्रमुख योगेश तेली, म्हापण सरपंच अभय ठाकुर, चीपी सरपंच गणेश तारी, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, केळूस माजी उपसपंच योगेश शेटये, इत्यादी उपस्थित होते.

