आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

◾रक्ताचा कोठेही तुटवडा होऊ नये म्हणून तरुणांनी उत्स्फुर्तपणेकरावे रक्तदान ; शिवप्रेमी सिंधुदुर्ग

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ, दि-१४ :- शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आज शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये तरुण युवक, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी मिळून ३३ जणांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात शंभुवंदना म्हणून झाली.

यावेळी अंकुर सिड्स प्रा. लि. नागपूर, महाराष्ट्र या कंपनीच्यावतीने मे. प्रभू एजन्सी कुडाळ मार्फत रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला कॉलेज बॅग्स देऊन गौरविण्यात आले.

रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांनी पुढे येऊन रक्तदान करून कोव्हिडविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले.

शिबिरासाठी श्री. मंदार शिरसाट यांच्यावतीने न्याहारी, श्री. अमित चव्हाण आणि सहकारी मित्र यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या तसेच श्री. स्वप्नील तेरसे यांच्याकडून सॅनिटायजर स्प्रे प्रायोजित करण्यात आले होते. शिबिरासाठी मदत केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात लोकांचे शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!