आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾घोटगे गावचे माजी सैनिक काशिराम लाडू दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शंकर जाधव

🎴दोडामार्ग, दि-१४ :- घोटगे गावचे माजी सैनिक काशिराम लाडू दळवी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.११ मे २०२१ रोजी निधन झाले.सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री. संतोषाकुमार दळवी, ऍड समीर दळवी यांचे ते वडील होत.

कै. काशिराम लाडू दळवी यांनी सैन्यात २२ वर्ष्याची दीर्घ सेवा इमाने इतबारे बजावत असताना अनेक शौर्य पदके मिळवली व सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी गोव्यात खाजगी सेवा बजावत असताना आपल्या चारही मुलांना उच्य शिक्षण देऊन स्वतः च्या पायावर उभे केले, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता संतोषकुमार दळवी, ऍड.समीर दळवी, माजी सैनिक महिला लिंक सावंतवाडी अध्यक्षा सौ. मीना सावंत, उद्योजिका रीना भुजबळ ही त्यांची मुले, आज त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाने समाजात ताट मानेने जगत आहेत. त्यांनी माजी सैनिक सेवा संग साटेली-भेडशी मध्ये काम करीत असताना माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “माजी सैनिक संकुल”  साटेली-भेडशी बाजारपेठेत उभारले त्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शेती बागायतीत लक्ष देत असताना शेवटच्या काळात त्यांनी “श्री.कुल दैवत भवानी मातेचे मंदिर” आपल्या घोटगे गावात बांधून मुर्तीची प्राण प्रतिस्थापना करून मंदिर भक्तांसाठी खुले केले. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

शेवट पर्यंत अपार कष्ट करणे हे त्यांनी सोडले नाही. त्यांच्या पच्छात पत्नी, मुलगे संतोष कुमार दळवी, समीर दळवी, मुली सौ. मीना सावंत, सौ. रीना भुजबळ, नातू पराग सावंत, अरीन भुजबळ, आराध्य दळवी, श्रीहर्षं दळवी नात प्राची दळवी, सेजल दळवी, कांची दळवी, सुना सौ. समीक्षा दळवी, सौ समृध्दी दळवी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!