आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बाळा आकेरकर मित्र मंडळाच्या वतीने आज बांदा शहरात सेवा बजाविणाऱ्या आरोग्य,पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना नाश्ता व पिण्याच्या पाण्याचे करण्यात आले वाटप..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतीनिधी: शैलेश गवस

🎴बांदा, दि-१४ :- बांदा येथील बाळा आकेरकर मित्र मंडळाच्या वतीने आज बांदा शहरात सेवा बजाविणाऱ्या आरोग्य,पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना नाश्ता व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. आकेरकर मित्रमंडळाने कोरोना कालावधीत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आकेरकर मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत आज १००जणांचे नाश्त्याचे वाटप करण्यात आले.या मध्ये अहोरात्र सेवा देणारे बांदा प्रार्थमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी,आरोग्य कर्मचारी ,शहरातील रस्त्यावर सेवा बजावणारे पोलिस कर्मचारी ,बांदा सट मटवाडी येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले कर्मचारी , पत्रादेवी सीमेवरील पोलिस कर्मचारी ,इन्सुली तपासणी नाक्यावरील कर्मचारी ,बांदा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना नाश्ता व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. कोविड कालावधीत आरोग्य व पोलिस कर्मचारी दिवस रात्र सेवा बजावत आहेत.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना नाश्ता व पाणी देण्याचा निर्णय बाळा आकेरकर यांनी घेतला.यावेळी माजी सरपंच बाळा आकेरकर,सुनील धामापुरकर,अमित धुरी,पत्रकार निलेश मोरजकर,राकेश परब,विराज परब,शैलेश गवस आदी उपस्थित होते. आकेरकर मित्र मंडळाच्या दातृत्वाबाबत वैद्यकिय अधिकारी डॉ.जगदीश पाटील व पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!