आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययावत अशा कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात..

 

◾जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती शर्वाणी गांवकर यांनी केली जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट व्यवस्थापन समिती अध्यक्षा के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१३-: कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी व कणकवली तालुक्यातील कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांना खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययावत अशा कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती सौ. शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट व्यवस्थापन समिती अध्यक्षा के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे सादर केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत उपस्थित होत्या.

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, प्राथमिक आरोग्य केंद्र, वेंगुर्ला तालुक्यामधील रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र व कणकवली तालुक्यातील कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपलब्ध असलेल्या रुग्ण वाहीका वारंवार नादुरुस्त होत आहे. तसेच सध्याच्या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभुमीवर अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहीका उपलब्ध नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना संदर्भ सेवा देताना अडथळे निर्माण होत आहेत. तरी सदर वस्तुस्थितीचा विचार करता अत्याधुनिक सोयीनेयुक्त प्रत्येकी एक कार्डियाक रुग्णवाहीका मळेवाड, रेडी व कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट व्यवस्थापन समिती अध्यक्षा के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे या निवेदनाद्वारे केली आहे.

मळेवाड, रेडी व कासार्डे ही गांवे प्रमुख खनिज उत्खनन प्रभावित क्षेत्रात येतात. मात्र, संदर्भिय प्रशासकिय मान्यता आदेशात प्रा.आ.केंद्र मळेवाड, रेडी व कासार्डे समावेश नाही. त्यामुळे सदर गावांचा यात समावेश करण्यात यावा व या तिन्ही गावांना अद्ययावत अशा कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात जेणेकरून तीन तालुक्यांमधील रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकतो, असेही त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!