आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रोजगारासाठी जाणाऱ्या गरीब मुलांच्या रोजगारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सकारात्मक तोडगा काढावा ; मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक युवती ह्या रोजगारासाठी गोवा राज्यात नेहमी जात येत असतात. आजपासून त्यांची पत्रादेवी येथे अडवणूक केली जात आहे. हे पूर्णतः चुकीचे असल्याचे मत मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रोजगारासाठी येणाऱ्या गरीब मुलांच्या रोजगारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत त्यानी प्रसिद्धपत्रक दिल असून त्यात त्यांनी असे म्हटल की गोवा राज्याला रस्त्यासाठी लागणारी खडी, दगड असे सिंधुदुर्गातून पुरवला जात आहे. त्याचप्रमाणे नोकरदार वर्ग देखील शासनाने घातलेल्या अटीचे पालन करतच गोव्यात जात आहे. ज्या ज्या कंपनीत ही मुले काम करत आहेत. त्या कंपनीच्या अटी शर्ती मध्ये राहून काम करत आहेत. त्यांना अशा प्रकारे कोरोना चाचणी करणे बंधनकारक असल्याचे सांगणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले आहेत. त्यांच्यावर टीका होत असताना पण त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा केला होता. त्याचप्रमाणे मुलांच्या रोजगाराचा प्रश्न देखील सकारात्मक सोडवून सहकार्य करावे अशी विनंती प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!