◾’जागतिक नर्स डे’ च्या निमित्ताने विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने परिचारिकांचा सत्कार..
◾कोरोना काळात देत असलेल्या सेवेबद्दल केला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार..
◾पारीचारिकांविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले गौरवोद्गार
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-१३ :- कोरोना काळात पारीचारिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना उत्तम सेवा दिली व देत आहेत,यासाठी नर्स डे चे औचित्य साधत श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पारीचारिकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी जिल्ह्यातील परिचरिकांविषयी गौरवोद्गार काढले.
यामध्ये जिल्हा रुग्णालय ओरोस येथील नर्स सौ. प्राची प्रमोद राणे यांसह उपस्थित नर्स व्ही.व्ही.येळेकर, डिसोझा, व्ही.व्ही.गोसावी, आचरेकर, सुप्रीया नाईक, धारगळकर, पी.पी. सावंत यांचा गौरव करण्यात आला.यावेळी एसपी राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर,वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, डॉ. दुर्भाटकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत,दिनेश शिंदे आदि उपस्थित होते.
आपल्या घरातली माणसे देखील कोरोना झाल्यावर परकी होतात,तिथे त्यांची काळजी घेणे, भावनिक पाठिंबा देणे,धीर देणे,व रुग्ण पूर्ण बराहोईस्तोवर त्यांना कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता मदत करणे अशा सर्वच आघाड्यांवर नर्सेस काम करत असतात.याची दखल श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेने घेत सर्व जिल्ह्यातील पारीचारिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला.
दरम्यान ‘श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना आणि युवा रक्तदाता संघटना यांचे कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे’,असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि उपस्थित मान्यवरांनी काढले.

