◾मंजूर झालेल्या दोडामार्ग – बांदा रस्त्याचे पुढे काय झाले ; प्रत्यक्षात मात्र निराशाच ; म. न. वि. से. तालुकाध्यक्ष अक्षय कुबल
◾तो रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी अन्यथा लोकडाऊन कालावधी संपल्यावर मनसे करणार खळखट्यक आंदोलन..
◾हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडू
◾जो पर्यंत प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू होत नाही तो पर्यंत कोणत्याही आश्वासनांना बळी पडू नये
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१३ :- दोडामार्ग तलुक्यातील रस्त्याच्या प्रश्नांवर दोडामार्ग मनसे आक्रमक झालेली आसून, अनेक पक्षांनी अनेक आंदोलने करून सुद्धा अजूनही दोडामार्ग वरील रस्तांना अद्याप न्याय मिळालेला नाही. अशातच आता मनसे ने घेतलेला आक्रमक पवित्रा घेत बांदा – दोडामार्ग हा रस्ता पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी प्रसिद्धी प्रत्रकाद्वारे केली आहे .यात त्यांना कितपत यश मिळेल हे पाहणे गरजेचे आहे.
लोकडाऊन कालावधी संपल्यावर हात जोडून न्याय मिळत नसेल तर हात सोडून न्याय मिळवा ह्या राज ठाकरे साहेबांच्या म्हणण्यानुसार मनसे खळखट्याक आंदोलन देखील करणार आहे. असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अक्षय कुबल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे तसेच या आंदोलनात तालुक्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

