कृषिकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शेतकऱ्यांना सौरकुंपनाची अत्यंत गरज………. ▪️वनविभागाने मार्गदर्शक फलक लावणे बरोबरच उपाय योजना करणे सुद्धा गरजेचे…. ▪️वनव्यवस्थापन समित्या केवळ नावापुरत्याच….. ▪️राजकीय इच्छाशक्तीची सुद्धा गरज….

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि१२मे,:सिंधुदुर्ग वनविभागाकडून दर वर्षी लाखो रुपये मार्गदर्शक फलक तसेच इतर उपाययोजना करण्यासाठी खर्च केले जातात मात्र वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीपोटी केवळ तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याला दिली जाते आणि ही रक्कम मिळवण्यासाठी सुद्धा कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची फार दमछाक होते. कारण कोकणामध्ये जमीन धारणा पद्धती गुंतागुंतीची असल्याने अनेक शेतकरी ही नुकसान भरपाई घेण्याची सुद्धा नाकारतात. मुळात वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हे विचारात न घेता शासनाचे अधिकारी उपायोजना ठरवत असतात. आणि त्याचा काहीच उपयोग शेतकऱ्यांना होत नाही वनविभागाने आपल्या हद्दीत येणाऱ्या जंगलाला सौर कुंपण घातले आहे किंवा अनेक ठिकाणी चर सुद्धा खोदले आहेत मात्र या वन्य प्राण्यांना जंगलात कोणत्या प्रकारचे खाद्य न मिळाल्यामुळे हे सगळे अडथळे पार करून ते शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतीचे नुकसान करतात मुळात वातावरणातील बदलामुळे शेतीचे नुकसान होत आहेत आणि त्यातूनही सावरलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून होणाऱया नुकसान बघता शेतकरी दरवर्षी तोट्यातच आपली शेती करत असतो. वनविभागाकडून जंगल तोड होऊ नये म्हणून अनेक गावांमध्ये मोफत गॅस कनेक्शन दिले गेले आहे शिवाय जनजागृतीसाठी फार मोठा पैसा खर्च केला जातो. मात्र त्याऐवजी सध्या शेतकऱ्यांना सौर कुंपण यासाठी लागणारे झटका मशीन सौर पॅनल व तार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून त्यांना मदत स्वरूपात दिले गेली तर शेतकरी फक्त आपल्या शेतीपूरतेच कुंपन करेल व राहिलेल्या जंगलामध्ये वन्य प्राणी आपल्या मुक्त संचार करू शकतात .आज अनेक शेतकऱ्यांना सौर कुंपणाची ही उपाययोजना करताना शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही कृषी विभागाकडून फळबाग लागवडीसाठी 100 टक्के अनुदान मिळत आहे मात्र वन्यप्राण्यांकडून होणाऱया नुकसानीसाठी कुठल्याही शासकीय विभागाकडून उपाययोजना मिळत नाही किंवा अनुदान मिळत नाही अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्यास त्याचा फार मोठा उपयोग शेतकऱ्यांना होऊ शकतो . सिंधुदुर्गात बांबूचे फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते तसेच काजू भात शेती देखील मोठ्या प्रमाणात केले जाते पावसाळ्यात बांबूचे येणारे कोम गव्यांकडून फस्त केले गेल्यामुळे अनेक बांबू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तसेच सांबरां कडून काजूच्या झाडाची मोठ्या प्रमाणात मोडतोड होते. भातशेतीचे डुक्करांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते .तसेच दोडामार्ग मध्ये केळी बागायतीचे व आंबोली मध्ये उसाचे हत्ती फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतात मात्र शेतकरी असंघटित असल्यामुळे आणि राजकीय नेत्यांनी याची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे किंवा इच्छाशक्ती नसल्यामुळे यावर कोणते उपाय योजना केल्या जात नाहीत. अनेक गावामध्ये वन व्यवस्थापन समितीची स्थापना केली गेली आहे मात्र या समित्यांकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत .सुरुवातीला काही गावांमध्ये क प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना सौर कुंपणाची सामुग्री देऊन त्या वर्षी त्या गावात किती कमी प्रमाणात नुकसान झाले याचा अभ्यास केला गेला आणि त्यानंतर इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी केल्यास त्याचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल मात्र यासाठी राजकीय इच्छाशक्ती बरोबरच वनविभागाची मानसिकता देखील तेवढीच महत्त्वाची आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!