आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾कसाल मध्ये बीएसएनएल सेवेचा बोजवारा..

 

◾इंटरनेट सेवा विस्कळीत ; पोस्ट बँकांचे व्यवहार ठप्प      ◾नागरिकांना धान्यसाठी मारावे लागतात हेलपाटे

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल, दि-११ :- कुडाळ तालुक्यात कसाल मध्ये गेले चार पाच दिवस बीएसएनएल सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून खंडित सेवेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल रेंज नसल्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली त्यामुळे पोस्ट बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे सुरू आहेत . डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या दुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यात कानाकोपऱ्यात नागरिकांच्या हातात मोबाईल पोचले आहेत. कसाल पंचक्रोशी व बाजारपेठ वगळता अन्य ठिकाणी बीएसएनएलची रेंज मिळते मात्र अनेक ठिकाणी बीएसएनएल असल्याने ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत .गेले चार-पाच दिवस बीएसएनएल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे त्यावर अवलंबून असलेले सेवा खंडित झाली आहे त्या विस्कळीत कारभाराकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. इंटरनेटचे बंद झाल्याने पोस्टाचे बँकातील व्यवहारावर याचा परिणाम जाणवत आहे कामे होत नसल्यामुळे नागरिकांचे हेलपाटे सुरू आहेत. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे नाईलाजास्तव ग्राहक इतर टेलिकॉम कंपनीकडे वळत आहेत . मोबाईल व इंटरनेट सेवा पुरविण्याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!