आणखीआरोग्यमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾मृत्यू व बाधितांची संख्या घटली ; नव्याने आणखी ३७२ रूग्ण बाधीत..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सिंधुदुर्गनगरी,दि,१० :- जिल्ह्यात आज नव्याने ३७२ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ११ हजार ७०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ५ हजार ११२ रुग्णांवर जिल्ह्यात ठिकठिकाणी उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली.

मृतांमध्ये चाफेखोल-मालवण येथील ८० वर्षीय महिला आहे. तिला हृदयरोग,उच्चरक्तदाबाचा त्रास होता. आंदुर्ले-कुडाळ येथील ७५ वर्षीय पुरुष आहे. त्याला हृदयरोगाचा त्रास होता. विजयदुर्गे-देवगड येथील ७४ वर्षीय महिला आहे. तिला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कलंबिस्त- सावंतवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष आहे. त्याला कर्करोग होता. दरम्यान ४ जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!