आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही बँक कर्मचारी कामावर हजर

 

◾पालिकेकडून सर्व बँक कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट करण्याचे आदेश

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-१०:- कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही एका बँकेचा कर्मचारी नेहमी प्रमाणे आपल्या कामात व्यस्त होता. सावंतवाडी पालिकेच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी बँकेला कामकाज बंद करण्यास लावून कार्यालय सॅनिटराईज केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची Rtpcr test करण्यास बॅक व्यवस्थापनाला सांगितले. या कर्मचाऱ्याने कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर टेस्ट केली होती. त्याचा अहवाल शनिवारी आला. त्याच्याशी पालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवार- रविवारी अनेक वेळा फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरीही संपर्क होत नव्हता. सोमवारी त्याचा संपर्क झाला तेव्हा तो एका बँकेचा कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. तो बँकेत काम करत असताना पालिकेने बँकेचे काम थांबवून बॅक व्यवस्थापनाला सदर बॅक सॅनिटराईज करण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!