आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾कोरोना काळत फ्रंट लाईन वर्कर म्हणून करणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर लोक प्रतिनिधींची पूर्ण पणे पाठ..

 

◾पिपिई किट, हँड ग्लोज शिवाय करावा लागत आहे सर्वे..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग

🎴 सिंधुदुर्ग, दि-०८ :- कोरोना वैश्विक महामारीच्या काळात ग्रामिण स्तरावर आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून आशा स्वयंसेविका अविरतपणे आपल्या जिवाची पर्वा नकरता काम करत आहेत.

सध्या त्यांना आरोग्य विभागाकडून तसेच ग्रामपंचायतीकडून गावात फिरून परजिल्हातून किंवा राज्यातून आलेल्या व्यक्तिंचा सर्वे करायला सांगितला जातो या वेळी त्या गावातील प्रत्येक घरात जऊन सर्वे करतात तसेच कोरोना पॉझिटीव रुग्ण सापडलेल्या घरी जाऊन त्या रुग्णाच्या घरच्यांना काही त्रास जाणवतो की नाही याची दखल घेतात. आपल्या जिवाची पर्वा न करता आशा स्वयंसेवीका अविरतपणे काम करतात. अशी अविरतपणे सेवा बजावणाऱ्या या आशा स्वयंसेविकांना पिपिई किट, हँड ग्लोज दिले गेले नाही. मोठ मोठी घोषणा करणारे लोकप्रतिनिधींना देखील त्यांना पिपिई किट, हँड ग्लोज मिळावे यासाठी कोणताही पाठपुरावा केलेला दिसून येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!