◾केसरी येथील युवकाचे आकस्मित निधन..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी, दि-०८ :- केसरी येथील निखिल उर्फ भैय्या झिलू सावंत (२७) या युवकाचे शुक्रवारी सायंकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. पाच दिवसांपूर्वी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला प्रथम पडवे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तेथून त्याला कोल्हापूरला नेले मात्र अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचे सायंकाळी ७च्या सुमारास निधन झाले. रात्री गोव्यातून त्याचे पार्थिव केसरीत आणल्यानंतर उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांचा तो पुतण्या होय.

