सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी कसबा डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची तांत्रिक टीम सावंतवाडीत..

नगराध्यक्ष संजू परब यांचे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे स्वप्न होणार पूर्ण..

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या माध्यमातून २०१७ पासून  संजू परब यांचे सुरू होते प्रयत्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०६: शहरात शीव उद्यान समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी घोषित केल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेच्या मासिक सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज या जागेची पाहणी करण्यासाठी कसबा डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वाती पोवळे व सचिन सावंत सावंतवाडीत दाखल झाले व नगराध्यक्षांसमवेत शोधन समोरील जागेची पाहणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी त्यावेळचे सावंतवाडी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी १३-१-२०१७ रोजी आपल्या कार्यालयात याबाबतची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवस्मारक समिती स्थापन करून त्यावेळेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी जागेची मागणी केली होती. मात्र, सावंतवाडी नगरपालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने संजू परब जागेच्या शोधात होते. सावंतवाडी नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाला गती मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात संजू परब यांनी सावंतवाडीत अश्वारूढ पुतळा उभारणार अशी घोषणा केली होती, व सावंतवाडी नगरपालिकेच्या  बैठकीत तसा ठराव घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले.

आज मुंबई येथील कस्बा डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वाती पोवळे व सचिन सावंत यांनी सावंतवाडीत येऊन शीव उद्यान समोरील जागेची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष संजय परब, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी उपस्थित होते.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!