▪️• सिंधुदुर्गच्या मदतीला धावले गोव्याचे मुख्यमंत्री
• *▪️गोवा- वेर्णे येथील ऑक्सिजन प्लांटमधील क्सिजनसाठा सिंधुदुर्गला देण्याचे केले मान्य*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-*प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी,दि*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सीजनचा तुटवडाही भासत आहे. रायगड कोल्हापूर येथून ऑक्सिजन उपलब्ध होणे कठीण झाले आहे. त्यामुळे आपण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वेर्णे ऑक्सीजन प्लांट मधील ऑक्सीजन साठा सिंधुदुर्गसाठी देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोव्यात ऑक्सिजनचा साठा आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची कुलदेवता सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील आहे. त्यामुळे सिंधुदुर्गासाठी त्यांनी दाखवलेले दातृत्व निश्चितच आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले. लसीकरण बाबत ऑनलाईन नोंदणी होताना त्याच्या तालुक्यातील केंद्रानुसारच व्यक्तीला लस देण्याच्या दृष्टीने आपण राज्यातील आमदारांच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढू व लसीचा घोळ होणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे केसरकर यांनी स्पष्ट केले. आमदार दीपक केसरकर यांनी आज झूम अॅपद्वारे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले कोरोना आणि पाणी प्रश्न यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचे ठरवले आहे. सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ले या तीन तालुक्यात कोणीही या प्रश्नावरुन राजकारण करणार नाही. सावंतवाडी नगरपालिकेने ही माजगाव व चराठा या दोन गावांना तीन दिवसाने पाणीपुरवठा करण्याचे निश्चित केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*उमेश सावंत ९५७९५६५०१* *-७२१८६४१५६०*
*प्रोप्रा. सुरभी संतोष संगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

