◾सावंतवाडी भाजपतर्फे पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा जाहीर निषेध..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-०५ :- पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा जाहीर निषेध सावंतवाडी भाजपतर्फे करण्यात आला. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना सावंतवाडी भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी मृणालमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभर संचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा जाहीर निषेध भाजप तर्फे करण्यात येत आहे. सुडाचे राजकारण चालू आहे, घरांची जाळपोळ, दुकानांची नासधूस करण्यात येत आहे. भाजप कार्यकर्त्यावर असे हल्ले होणे निषेधार्थ असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात व सावंतवाडी त्याचे तीव्र पडसाद उमटतील याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे पत्रात म्हटले आहे.

