◾कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता आ. शेखर निकम ठेवून आहेत लक्ष..
◾संगमेश्वर-देवरुख रुग्णालयांना भेटी देत घेतला नुकताच कोरोना परिस्थितीचा आढावा..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-०५ :- गेल्या वर्षांपासून सुरू झालेला कोरोनाचा हाहाकार अजूनही सुरूच आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्ण व सर्वसामान्यांची फरफट होऊ नये, याकरिता चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम सातत्याने झटत आहेत. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. कोविड काळात आ. शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कोविड केअर सेंटरमधील सोयी- सुविधांसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. इतकेच नव्हे तर स्वखर्चातून जिथे जिथे गरज लागत आहे, तिथे तिथे आर्थिक हातभार लावत आहेत. नुकतेच संगमेश्वर-देवरुख येथील रुग्णालयांना भेटी देत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. एकंदरीत आ. निकम यांच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या वर्षी कोरोनाला सुरुवात झाली. सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर कोरोनाचा वेग मंदावला होता. मात्र, मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. आता परिस्थिती इतकी भयानक आहे की, रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. या परिस्थितीतदेखील शांत बसतील ते शेखर निकम कसे? रुग्णांच्या नातेवाईकांचे बेडसाठी फोन आले की, लगेच आरोग्य विभाग अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधून रुग्णांना बेडची व्यवस्था करीत आहेत. इतकेच नव्हे तर शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत तर नाही ना! याकडे देखील लक्ष ठेवून आहेत.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव राहू नये, याकरिता साहित्यांसाठी सुमारे ८२ लाख रुपयांचा निधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिला आहे. यामुळे येथील रुग्णालयात साहित्य उपलब्ध झाल्याने रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
गेल्या काही दिवसांत मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामध्ये संगमेश्वर-देवरुखमधील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, या करिता विशेष लक्ष दिले आहे. देवरुख येथील कोविड केअर सेंटरला नुकतीच भेट देताना येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी येथील रुग्णालयाच्या सोयी सुविधेसाठी संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसने २१ हजार रुपयांचे तर पुर्ये येथील भालचंद्र चव्हाण यांनी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. यानंतर संगमेश्वर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत तेथील परिस्थितीचाही आढावा घेतला. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात घेऊन आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मंडप उभारणार आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर होणार आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी आ. निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रक्तदान शिबिर घेऊन आम्ही जनसेवेत मागे नाही आहोत, हे दाखवून देत आहेत. आ. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ९ रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. एकंदरीत आ. शेखर निकम यांची कोरोना काळातील जनसेवा उल्लेखनीय आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

