आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात १० दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’ लावण्यात आल्याने बांदा बाजारपेठेत बुधवारी सकाळी काही ठीकाणी दिसून आली गर्दी..

 

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०५ :- दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रूग्ण संख्या लक्ष्यात घेऊन शासनाने सावंतवाडी तालुक्यात १० दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’ लावण्यात आल्याने बांदा बाजारपेठेत बुधवारी सकाळी काही ठीकाणी गर्दी दिसून आली. बांदा बाजारपेठेत लाकडाऊन काळात गेले महिनाभर बाजारपेठेत शांतता होती. पण दहा दिवसांचा जनता कर्फ्यु तालुक्यात जाहिर केल्यानंतर ग्र‍ाहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली. यावेळी सोशल डिस्टंसिंग, नियम धाब्यावर बसविल्याचे दिसून आले. कट्टा कार्नर येथे नागरीकांना पोलीसांनी ठीकठिकाणी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. पणं कोरोनाची कोणतीही भिती नागरिकामध्ये दिसत नव्हते. तात्काळ खरेदी करत नागरीकांनी काढता पाय घेतला.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, गर्दी पांगवण्यासाठी पोलीसांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्य‍ात येत होती. बुधवारी दुपारी ११ नंतर बाजारपेठेत गर्दीच प्रमाण काही प्रमाणात कमी झाले होते. “सावंतवाडी तालुक्यात ६ ते १५ मे या काळात “जनता कर्फ्यू” लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी,व्यापारी तसेच नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी या काळात रस्त्यावर येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.असा इशारा पोलिस व तहसीलदार प्रशासनाकडून यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!