आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली चा खोटा आदेश प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सायबर सेल मार्फत चौकशी करून गुन्हा दाखल करा..

 

◾ महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरअध्यक्ष आशिष सुभेदार यांचे उपविभागीय अधीकारी सावंतवाडी यांना निवेदनाद्वारे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴 सावंतवाडी,दि-०४ :- रविवार दिनांक २ मे २०२१ रोजी साधारतः सायंकाळी सोशल मीडिया वरून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे खोटे आदेश फिरले गेले सदर आदेश प्रथम कोणी सोशल मीडियावर टाकले त्याची चौकशी सायबर सेल मार्फत करण्यात यावी आणि त्याचा शोध घेऊन शासनाची व प्रशासनाची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत योग्य तो गुन्हा दाखल करावा.

सदर आदेशाची महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर तपासणी केली असता अशाप्रकारे आदेश उपलब्ध नाही तसेच संकेतस्थळावरील क्रमांक चुकीचा असून सदर आदेशातील बदल्यांचा तक्ता वेगळ्या फॉन्टमध्ये व इतर मजकूर वेगळ्या फॉन्टमध्ये असल्याचे दिसत आहे सदरील आदेशावरील स्वाक्षरी मधील स. रि. बांदेकर देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याशी संपर्क केला असता त्यांची बदली दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी त्या पदावरून अन्यत्र झालेली आहे.

त्यामुळे हा आदेश धादांत खोटा असून कोविड काळात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सक्षम जिल्हाधिकार्‍यांना विचलित करण्याकरिता हे कृत्य केलेले दिसत आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणीतरी वरिष्ठ अधिकारी अथवा अवैद्य खनिज उत्खनन करणाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शासनाची बदनामी करणाऱ्या प्रशासनातील व्हाईट कॉलर अधिकाऱ्यांना व दोन नंबरला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करून शासन करावे असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार उपशहर अध्यक्ष शुभम सावंत युवतीअध्यक्ष ललिता नाईक सचिव आकाश परब सहसचिव कृष्णा गावडे अनुप सोनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!