◾शिवसेना सरपंच संघटनेने घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची भेट..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०२ :- कोरोना संक्रमणाच्या काळात ग्राम कृती दल अध्यक्ष म्हणून काम करत असताना सरपंचांना बऱ्याच प्रसंगांना तोंड द्यावं लागते,ग्रामस्थांसोबत सोबतच ग्रामकृती दलाचे इतर सदस्य यांचीही जबाबदरी पार पाडत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच अनुषंगाने पालकमंत्री उदय सामंत ,खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन सरपंच यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या.. यातील प्रामुख्याने समस्या होती ती “लसीकरण”.माननीय पालकमंत्री,खासदार ,आमदार यांनी याबाबत सकारात्मक चर्चा करून प्राधान्याने जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि कोरोना काळात आघाडीवर असणारी ग्राम कृती समितीतील सदस्य यांना खास कॅम्प लावून तिथे लसीकरणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन न देता त्यादृष्टीने पाऊल उचलायला सुरुवात केली.
तसेच ज्या गावांमध्ये इतर शासकीय यंत्रणा जसे की पोलीस पाटील,तलाठी हे सरपंचांना सहकार्य करत नसतील अश्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून सरपंचांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिक्षा चालक यांना 1500/- अनुदान मिळण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या त्या अनुषंगाने RTO शी चर्चा करून तातडीने रिक्षा चालकांचे आधार कार्ड परमिट शी लिंक करन्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
COVID काळात अत्यावश्यक परिस्थितीत कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी आर्थिक तरतूद कारण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
सध्या असलेल्या लसिकरण केंद्रावरील गर्दी पाहता कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता पाहता प्राथमिक उपकेंद्र आणि पुढे गावातील एन सी एस क्लीनिक मध्ये लसिकरण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
विलंब होत असलेले स्वँब टेस्ट रीझल्ट लवकरच देण्यासाठी मागणी करण्यात आली.कोरोंनटाईन संदर्भात स्पष्ट निर्देश येत्या दोन दिवसांत देण्यात येतील .मोठ्या लोकसंख्येच्या गावांना विद्युत शवदाहीनी देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.
रेशनिंग संदर्भात सध्या आँनलाईन धान्य वितरण होत असून यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धान्य वितरण आँफलाईन पध्दतीने देण्यात यावे तसेच धान्य दुकानदार यांना धान्य उचल वेळेत द्यावी जेणेकरून दुकानावर गर्दी होणार नाही.
यावेळी पावशी सरपंच बाळा कोरगावकर, हुमसर सरपंच अनुप नाईक, नेरूर सरपंच शेखर गावडे, आवळेगाव सरपंच सुनील सावंत , कुंदे सरपंच सचिन कदम उपस्थित होते.

