आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात आज ६१ कोरोनाबाधित रुग्ण ; एकाचा मृत्यू

 

◾शहरातील १० तर ग्रामीण भागातील ५१ जणांचा समावेश ; आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावड

🎴सावंतवाडी, दि -०२:-‌  सावंतवाडी तालुक्यात रविवारी ६१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील १० तर ग्रामीण भागातील ५१ जणांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १४ रुग्ण बांदा येथील आहेत. मृत्यू झालेला रुग्ण हा रोणापाल येथील असून या मृत्यूमूळे मृतांची एकूण संख्या ७० वर पोहोचली आहे.

दरम्यान, रविवारी शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये खासकीलवाडा २, सबनीसवाडा २, गवळी तिठा १, भटवाडी १, जुनाबाजार, १, न्यू सालईवाडा २, सावंतवाडी शहर १ तर ग्रामीण भागात ओवळीये १,धाकोरा १,माडखोल ४, सोनूर्ली २, तळवडे ५, चराठा १, आंबेगाव १, शिरशींगे १, कोलगाव १, नेमळे २, दांडेली २, मळेवाड १, तळवणे २, कलंबिस्त २, चौकुळ १, चौकुळ (नेने) २, बांदा १४, इन्सुलि ५, कोंडुरे १, आरोंदा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. याबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!