आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

◾चिपळूणमध्ये खाजगी हॉस्पिटल मधील लसीकरण बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय..

 

◾शासकीय लसीकरणाच्या ठिकाणी नागरिकांची झुंबड..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-०२:- शासनाने खासगी हॉस्पिटलला लस देण्याचे बंद करून केवळ शासकीय यंत्रणे मार्फतच लसीकरण सुरू ठेवल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.१ मे पासून शासनाने खाजगी लसीकरण बंद करून केवळ शासकीय ठिकाणीच लसीकरण चालू ठेवल्याने नागरिकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली पाहण्यास मिळत आहे. यापूर्वी खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण होत असल्यामुळे ही गर्दी विभागली जायची. तसेच ज्या रुग्णांना सशुल्क लस घ्यायची होती ते खाजगी हॉस्पिटल मध्ये घेत होते. परंतु एक मेपासून खाजगी हॉस्पिटलला शासनाकडून देण्यात येणारी लस बंद करून त्यांनी थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. परंतु यासाठी कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने खाजगी हॉस्पिटल लस कोठून मिळवायची याबाबत संभ्रमात पडलेले दिसून येत आहेत. तसेच काही नागरिकांनी यापूर्वी खाजगी हॉस्पिटलमध्ये लस घेतलेली असताना दुसरी लस कोठे घ्यायची हा देखील मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. याबाबत शासनाच्या जिल्ह्यच्या ठिकाणच्या संबंधित व्यक्तींना संपर्क केल्यास त्यांना देखील खाजगी हॉस्पिटलमध्ये लस मिळवण्यासाठी लस कंपनीत कोणाकडे संपर्क करायचा याबाबत ठोस माहिती नसल्यामुळे एकच गोंधळ उडालेला दिसून येत आहे. तरी याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी समन्वय साधून खाजगी हॉस्पिटलमध्ये लस त्वरित उपलब्ध होण्याबाबत प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शासनाच्या लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन लसीकरण वेगाने होण्यास मदत होईल आणि कोरोना आटोक्यात येण्यासाठी मदत मिळेल.खाजगी हॉस्पिटलने शासकीय यंत्रणेकडे लस मिळविण्यासाठी भरलेली रक्कम देखील तशीच शिल्लक आहे.तरी या साऱ्या पार्श्वभूमीवर शासनाने त्वरित खाजगी रुग्णालयांना लस मिळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!