आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

◾म्हापण चव्हाणवाडी येथील मोहन म्हापणकर यांचे वृद्धाकाळाने निधन..

 

◾गेले वर्षभर सुरू होती आजाराशी झुंज..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला,दि-२८ :- म्हापण चव्हाणवाडी येथिल रहिवाशी श्री अर्जुन ऊर्फ मोहन बुधाजी म्हापणकर यांचे आज सकाळी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. मागील जवळपास वर्षभर ते आजारी होते. गेले काही महिन्यांपासून सुरू असलेला मृत्यूशी त्यांचा संघर्ष अखेर आज सकाळी संपला.

म्हापण गावातील एक आंबा व्यावसायिक, जाणकार शेतकरी व अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची समाजात ओळख होती. आपल्या उमेदीच्या काळात वाडीतील प्रत्येक प्रसंगात ते पुढे सरसावून काम करायचे.

त्यांच्या पच्छात ५ मुलगे, २ मुली, ५ सूना, आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी श्री विजय चव्हाण व पाट हायस्कूलचे लिपिक विलास म्हापणकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो अशी समस्त चव्हाणवाडीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!