◾साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियोजन शुन्य काम..

 

◾सकाळपासून ६० वर्षावरील नागरीक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रापाशी बसून..

◾मात्र लाईट नसल्याने लसीचे वितरण नाही ; नागरीकांना बोलावून लस न दिल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त ..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-२८ :- साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ६० वर्षांवरील नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.

आज दि.२८ रोजी ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक सकाळी आठ वाजल्यापासून साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणाऱ्या मंडपात बसुन आहेत.

परंतु लाईट नसल्यामुळे आज लस देण्यात येत नाही आहे. केर, निडली , भेकुर्ली अशा लांब लांब ठिकाणा वरून नागरीक लस घेण्यासाठी येत आहे.

काल रात्री झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे काल रात्री पासून लाईट नाही आहे. याचा विचार करून आरोग्य विभागाकडून नागरीकांना आज लस दिली जाणार नाही अशी माहिती दिली पाहिजे होती अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून होत आहे.

काही नागरीक दुपारी १२ वाजे पर्यंत वाट पाहून घरी गेले. त्यामुळे साटेली – भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या नियोजन शुन्य कामा मुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!