आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहंनांची संख्या घटली..

 

◾कामगारांना मात्र ओळखपत्रावरून सुट..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-२७ : – गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-पास सक्तीचा केल्याने  सीमेवर वाहनांची तुरळक वर्दळ होती. पहिल्या दिवशी शेकडो वाहनचालकांना ई-पास अभावी माघारी पाठविण्यात आल्याने आज महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मर्यादित होती.ज्यांच्या कडे ई पास नाही त्यांना गोव्यात माघारी पाठविण्यात आले.गोव्यात काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या गावाकडे जायचा परतीचा मार्ग धरल्याचे दिसत होते.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  रविवारी पासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्यांना ई-पास सक्तीचा करण्यात आला होता. पहिल्या  दिवशी अनेकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. ई-पास नसलेल्या शेकडो वाहनचालकांना पुन्हा माघारी गोव्यात पाठविण्यात आले. महाराष्ट्र राज्यात ई-पास शिवाय प्रवेश नाकारण्यात येत असल्याने आज जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तुरळक वाहतूक सुरू होती. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील सर्वच रस्ते सील करण्यात आल्याने व काल दिवसभर प्रयत्न करूनही महाराष्ट्र राज्यात प्रवेश मिळत नसल्याने आज ई-पास शिवाय राज्यात प्रवेश करण्यासाठी वाहनचालकांनी गर्दी केली नव्हती. अत्यावश्यक सेवा व माल वाहतूक सुरू होती.  ई-पास नसल्याने परजिल्ह्यातील वाहनचालकांनी महाराष्ट्र राज्यात येण्याचे टाळले. त्यामुळे सीमेवरील दोन्ही तपासणी नाक्यावर शुकशुकाट होता. सिंधुदुर्ग मधील गोव्यात रोजगारासाठी जाणाऱ्या युवक युवतीची सायंकाळी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!