◾सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यात कामाला जाणाऱ्या तरुण – तरुणींना ई पास संदर्भात असलेल्या त्रुटी दूर कराव्यात..

◾महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांची प्रसिधीपत्राकद्वारे सावंतवाडी तहसीलदार यांच्या कडे मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-२७ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४,००० तरुण- तरुणी गोवा या ठिकाणी कामानिमित्त जातात परंतु ई पास संदर्भात काही त्रुटी आहेत.काहींना त्या ठिकाणी रॅपिड टेस्ट, आरटीपीसीर टेस्ट पाहिजे तसेच ई- पास पाहिजे या सर्व गोष्टींमध्ये काहीजण संभ्रमात आहेत. त्यामुळे ई पास साठी वेबसाईट आहे ती आपण जाहीर करावी. त्यामध्ये कोण कोणते नियम आहेत तेही आपण जाहीर करावे व त्या पासचा कालावधी किती आहे याची सविस्तर माहिती द्यावी जेणेकरून कामानिमित्त त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर होतील कारण ती ई पासची साईड ओपन केल्यानंतर त्यामध्ये दोन बाबी दाखवतात दिलेले ऑप्शन वेगळे आहेत. तसेच काही गाव पातळीवर ग्रामपंचायतीमार्फत उपाययोजना करण्यात येत असतील तर ते सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष यांना कल्पना द्यावी व गोव्याला कामानिमित्त जाणार येणाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा व ते नियम लेखी स्वरुपात मिळावे अशी मागणी प्रसिधीपत्राकद्वारे सावंतवाडी तहसीलदार यांच्या कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!