आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक युवतींना ई- पास साठी अडवणूक करू नये ; भाजपच्या वतीने वेधण्यात आले प्रशासनाचे लक्ष..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-२५ :- गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक युवतींना ई- पास साठी अडवणूक करू नये.येणारे दोन ते तीन दिवस त्यांना मुभा देण्यात येणार आहे.त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळख पत्र किंवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्रावरून त्यांना मुभा देण्यात येईल अशी सूचना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बांदा – सटमटवाडी तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना दिल्या.यासंदर्भात भाजपच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.महाराष्ट्र -गोवा सीमेवर बांदा येथे आजपासून ई पासची अंमलबजावणी करण्यात आली.त्यामुळे दररोज गोव्यात ये जा करणाऱ्या तरुणांसमोर संभ्रम निर्माण झाला होता.आज येथील तपासणी नाक्यावर गोव्यात जाणाऱ्या तरुणांनी सरपंच अक्रम खान व उपसभापती शीतल राऊळ यांच्या नेतत्वाखाली तहसीलदार म्हात्रे यांची भेट घेतली.त्यावेळी या तरुणांनी आपली मतं व्यक्त केली.यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी तपासणी नाक्यावरील सहाय्यक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद यांना गोव्यात नोकरीसाठी ये जा करणाऱ्या तरुणांना पुढील तीन दिवस कंपनीचे ओळखपत्र किंवा आधारकार्ड पाहून सोडावे.त्यांची अडवणूक करू नये अशा सूचना दिल्यात.यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,उप सभापती शीतल राऊळ, तंटा मुक्ती अध्येक्ष गुरुनाथ सावंत,माजी उप सभापती विनायक दळवी,न्यानेश्र्वर सावंत , विलवडे सरपंच दिनेश दळवी,वीरेंद्र आठलेकर,विलास पावसकर यांच्या सह नोकरदार तरुण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!