◾सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात काही वर्षे बालरोग विभाग सांभाळणारे डॉ.राजेंद्र तिवारी यांचे उपचारादरम्यान निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२५ :- सावंतवाडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात काही वर्षे बालरोग विभाग सांभाळणारे डॉक्टर राजेंद्र तिवारी यांचे रीवा मध्य प्रदेश येथे उपचारादरम्यान निधन झाले काही वर्षापूर्वी त्यांनी सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयातून निवृत्ती घेत मध्यप्रदेश रीवा येथील आयुर्वेद महाविद्यालयात कार्य झाले होते.
त्यांना काही दिवसापूर्वी कोरोना ची लागण झाली होती, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले .काही वर्षे त्यांनी सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापनाचे व चिकित्सेचे काम केले होते.