आरोग्यकोकण

जिल्ह्यात ३ तालुक्यात आँक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे-पालकमंत्री उदय सामंत

सावंतवाडी दि.२४ एप्रिल (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे. आतापर्यंत एक लाख २९० लसीकरण झाले आहे. पहिला डोस ८२ हजार ४२८ तर दुसरा डोस १६ हजार २९० लोकांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली
जिल्ह्यात ९२ हजार ९९७ लोकांची तपासणी झाली त्यात ५८ हजार ९७३ लोकांची आरसीपीआर तर ३४ हजार २४ लोकांची रॅपिड तपासणी झाली तसेच ९२ हजार ९९७ लोकांच्या तपासणी मध्ये दहा हजार ९०६ बाधीत रुग्ण आढळले आहेत सध्या २ हजार ८६९ रुग्ण सक्रीय उपचार घेत आहेत तर तेराशे चाळीस गृहअलगिकरणात उपचार घेत आहेत उर्वरित रुग्ण प्रशासनाच्या केअर केंद्रात व खाजगी केंद्रामध्ये उपचार घेत आहेत, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

आतापर्यंत २५७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून हा रेशो २.४ आहे. जिल्ह्यात ऑक्सीजन प्लांट उभा राहिला आहे तरीही गुजरात वरून उद्या पर्यंत ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा येईल. नवीन ऑक्सीजन प्लांट सावंतवाडी ,कुडाळ व कणकवली येथे उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे असे ते म्हणाले
जिल्ह्यात ५२ व्हेंटिलेटर आहेत त्यापैकी २७ ठिकाणी ते मोकळे आहेत. आणखी १० व्हेंटिलेटर नियोजन मंडळातून दिले जात आहेत जिल्ह्यात रुग्णांचा बरे होण्याचा दर ७१.५ टक्के आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिवर इंजेक्शन मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्राम कृती कृती दल सक्रिय केले जात असून जिल्ह्यातील १२ तपासणी नाक्या पैकी सहा ठिकाणी प्रमुख तपासणी नाके आहेत त्या ठिकाणी आरोग्य पथके नेमली आहेत कोकण रेल्वेच्या सहा रेल्वे स्थानकावर तपासणी पथके तैनात करण्यात आली आहे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात पोलीस विभागांमध्ये ८५ टक्के, महसूल विभागात ८४ टक्के, आरोग्य विभागात ९५ टक्के तर पंचायतराज विभागात लसीकरण झाले आहे. यापुढील शक्यतो ऑनलाईन बैठका घ्याव्यात म्हणून सरकारी व निमसरकारी संस्थाना आव्हान करण्यात आले आहेत असे पालकमंत्री सामंत म्हणाले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कंपन्यांमध्ये खबरदारी घेताना आरटीसीपीआर तपासणी केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत प्रत्येकाने स्वतः समुह आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी खबरदारी घ्यावी असे पालकमंत्री सामंत म्हणाले जिल्ह्यात तुटवडा भासत आहेत कोविड लस व रेमडेसिवर इंजेक्शन मिळावी म्हणून प्रयत्न आहेत सध्या या दोन्ही बाबतीत केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. ग्राम कृती दलाचे लसीकरण प्राधान्याने करावे असे निर्देश देण्यात आले असून सरपंच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सरपंचांना विमा कवच दिले जावे असा केंद्र सरकारचा निर्णय झाला होता तो बदलला गेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करू असे ते म्हणाले
जिल्ह्यात पाणीटंचाई बाबतीत सावंतवाडी, कुडाळ, व कणकवली आमदारांनी बैठका घेऊन नियोजन करावे जिल्हाधिकारी त्याला मान्यता देतील असे त्यांनी सांगितले

राज्यात उच्च माध्यमिकच्या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याशी चर्चा झाली असून राज्यपाल यांची भेट घेऊन या बाबतचा आढावा घेण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरु कसे होईल या दृष्टीने देखील सरकारचा प्रयत्न राहील असे पालकमंत्री सामंत म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!